युतीचा महामेळावा : शिवसेना-भाजप युती अभेद्य! -फडणवीस, आता पवारांना भाजपत घेऊ नका -उद्धव ठाकरे

1

अमरावती | शिवसेना आणि भाजप युतीची घोषणा झाल्यानंतर अमरावती येथे युतीचा पहिला संयुक्त महामेळावा होत आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युती झाल्यामुळे काही जणांच्या पोटात दुखत आहे, पण ही निवडणुकीपुरती नाही तर विचारांची युती आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी युती झाली नसती तर विरोधकांचे फावले असते असे म्हणत युतीबाबत भाष्य केले. मेळाव्याच्या अखेरीस मुंबईतील सीएसएमटी अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

युती अभेद्य – फडणवीस

>> शिवसेना-भाजपा युती ही अभेद्य! ही निवडणुकीपुरती नाही. सत्तेसाठी नाही.
>> ही विचारांची युती आहे. म्हणूनच ती टिकली आणि भविष्यातही टिकणार आहे.
>> पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला, उजाला, पंतप्रधान जनारोग्य, शेतकरी सम्मान निधी, गरिबांसाठी अनेक योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत.
>> निवडणुकीतील विजयापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक आनंद देतो.
>> देशातील सर्वाधिक रोजगार एकट्या महाराष्ट्रात निर्माण झाले. २७% रोजगार निर्मिती केवळ ११ महिन्यांत झाली.
>> कल तक जो नामुमकिन था अब वो मुमकिन है! हा विश्वास आता लोकांमध्ये निर्माण झाला.
>> आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही. एक माघार घेतो, दुसरा म्हणतो मी उभा राहणार नाही, पत्नी निवडणूक लढवणार.
>> सत्ता येईल-जाईल; पण देश महत्त्वाचा आहे. हा नवीन भारत आहे. ये घुसेगा भी और ठोकेगा भी!
>> गेल्या वेळी ४२ जागा जिंकल्या. तो आपला रेकॉर्ड नव्हता. खरा रेकॉर्ड तर २०१९ मध्ये करायचा आहे. पूर्ण ताकदीने महाराष्ट्राला भगवे केल्याशिवाय राहणार नाही.

जनतेचेच मुद्दे उचलले… – उद्धव ठाकरे

>> सर्वांचे लक्ष लागले होते की आम्ही आता काय बोलणार. गेले 15 दिवस काय बोलायचे हे सुचत नव्हते.
>> चार वर्षे भांडून अचानक गोड कसे झाले, यामागे कारण आहे.
>> आम्ही उचललेले मुद्दे हे जनतेचे आणि शेतकऱ्यांचे होते.
>> आमचे मुद्दे युती करताना मान्य करून त्यावर कार्यवाहीही केली, याचा आम्हाला अधिक आनंद आहे.
>> सामान्य माणसांच्या आशेवर पाणी पडता कामा नये. कारण शिवसेना-भाजप युती ही सामान्य माणसाची अंतिम आशा होती.
>> काँग्रेसच्या राज्यात हिंदू आहोत हे म्हणायचीही भीती वाटत होती. हिंदू ही शिवी वाटत होती.
>> युती झाली नसती तर विरोधकांचे फावले असते. देशाचा आणि हिंदुत्वाचा विचार करून आपण एकत्र आलो आहोत.
>> आता पवारांना भाजपमध्ये घेऊ नका. टीका करण्यासाठी कोणाला तरी ठेवा. सगळ्यांनाच पक्षात घेतले तर बोलायचे कोणावर?
>> युती झाल्यामुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

 

भाजपा- शिवसेना महायुतीचा अमरावती विभागाचा महामेळावा

BJP Maharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 15, 2019