पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’, पाठलाग करत तरुणावर जमावाचा हल्ला

घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे | हातात कोयता घेऊन पाठलाग करणारा जमाव आणि जिवाच्या आकांताने पळणारा तरुण. मुळशी पॅटर्न सिनेमातल्या प्रसंगासारखी थरारक घटना पुणेकरांनी सोमवारी प्रत्यक्ष अनुभवली. स्वारगेटमधील पुणे-सातारा रोडवर एका तरुणाचा खून करण्यासाठी जमाव मागे लागला होता. मात्र, तरुण एका दुकानात शिरल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मागील 20 दिवसांत पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तब्बल 12 हत्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण आहे.