महिला दिनी गोंदियात महिलांनी काढली बाईक रॅली, दिला हेल्मेट घालण्याचा संदेश

2

गोंदिया | आज राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के अधिकार मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरी मध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचे अनेक उदाहरण बघावयास मिळतात. त्यातच गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला 20 वर्षाचा कालावधी लोटला असून पहिल्यांदाच जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकरी आणि पोलिश अधीक्षक म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात आली असून डॉ कादंबरी बलकवडे ह्या जिल्हाधिकरी म्हणून काम पाहत आहेत तर वनिता शाहू हे पोलिश अधीक्षक म्हणून कामकाज पाहत आहेत.

आज महिला दिना निमित्त महिला विकास आर्थिक महामंडळातर्फे गोंदिया शहरात महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये स्वतः जल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हापोलिस अधीक्षक विनिता साहू सहभागी झाल्या. गोंदिया शहरातील नेहरू चौक मधून ही रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून शहरात ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये प्रत्येक महिलांनी हेल्मेट घालून सहभाग घेतला व शहरवासीयांना मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावे असा संदेश दिला. येणाऱ्या निवडणूकीत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे असे संदेशही या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून दिला.