पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या पत्नीचे पतीने पाय धुवून केले स्वागत

1

बुलडाणा | मातोळा येथील सरपंचाने पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण पुर्ण करुन येणा-या पत्नीचे चक्क पाय धुवून स्वागत केले आहे. मोताळा तालुक्यातील पोफळी या गावात हे अनोखे स्वागत करण्यात आले. पोकळी गावचे उपसरपंच विशालभाऊ व्यवहारे यांच्या पत्नी रुपालीताई विशाल व्यवहारे या गेल्या 4 दिवसांपासून पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. आपले गाव पाणीदार करायचा संकल्प करून त्या गावात परतल्या, तेव्हा गावात त्यांच्या स्वागताला पुर्ण गाव उपस्थित होते. एवढेच नाही तर विशालभाऊ यांनी त्यांच्या पत्नीचे स्वतः पाय धुवून स्वागत केले. आजच्या काळात सुद्धा महिलेला दुय्यम वागणूक दिली जात असताना विशालभाऊ एवढे मोठे पाऊल उचलल्याचा गावक-यांना सार्थ अभिमान आहे. लक्ष्मी पुजणाने गाव पाणीदार होईल असे म्हणत रुपाली यांचे अनोखे स्वागत करण्यात आले.