राहुल गांधी म्हणाले- ‘कमकुवत मनाचे मोदी चिनी राष्ट्रपतींना घाबरतात, चीनविरुद्ध त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही’

3

नवी दिल्ली | मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळामध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र चीनने याविरुद्ध नकाराधिकाराचा वापर केला. चीनने आडकाठी घातल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगला घाबरले आहेत. यामुळे त्यांच्या तोंडून चीनविरुद्ध एक शब्दही निघत नाही. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘कमजोर मोदी हे शी जिनपिंगला घाबरले आहेत. चीन भारताविरुद्ध पाऊल उचलतो तेव्हा त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही.’ राहुल गांधींनी दावा केला की, ‘मोदीची चीन कूटनीती : गुजरातमध्ये शी जिनपिंगसोबत झोका खेळणे, दिल्लीत त्यांना मिठी मारणे, चीनमध्ये गुडघे टेकणे.’

चीनने आडकाठी घातल्यानंतर या संपूर्ण घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाने निराशा दर्शवली आहे. मंत्रालयाने म्हटले की, ‘आम्ही निराश आहोत. मात्र आम्ही इतर पर्यायांवर काम करत राहणार आहोत. मंत्रालयाने म्हटले की, आम्ही हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र मंडळात करणाऱ्या राष्ट्रांचे आभारी आहोत.’