लोकसभा 2019: वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर, औरंगाबादचा तिढा कायम

3

एएम न्यूज नेटवर्क । लोकसभेच्या महासंग्रामाला सुरुवात झाल्याबरोबर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांना सामील करून घेण्यासाठीची बोलणी फिसकटली आणि प्रकाश आंबेडकरांनी एआयएमआयएमच्या साथीने वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. वंचित बहुजन आघाडीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठी 37 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ही नावे जाहीर केली.

औरंगाबादेत कोळसे पाटील की इम्तियाज जलील?

मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या औरंगाबाद मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळनार याबाबत प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. यानंतर एमआयएमचा विरोध आणि काँग्रेस – राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची शक्‍यता नसल्याने कोळसे पाटलांनी आता वंचित आघाडीऐवजी जनता दलाकडून औरंगाबादेतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने जनता दलाला पाठिंबा द्यावा, अशी नवी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच औरंगाबादेतील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे गेले दोन दिवस एमआयएमच्या हैदराबाद येथील मुख्यालयात तळ ठोकून होते. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची जागा आता एमआयएमच्या पदरात पडण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. आघाडीच्या चर्चेला दिलेला पूर्णविराम आणि कोळसे पाटील यांनी जनता दलाकडून लढण्याचा घेतलेला निर्णय लक्षात घेता औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमला मिळून आमदार इम्तियाज जलील हे मैदानात उतरू शकतात, अशी जोरदार चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पत्रकार परिषदमुंबईआद: प्रकाश आंबेडकर

Balasaheb Ambedkar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 15, 2019

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी

वर्धा – धनराज वंजारी
रामटेक- किरण रोडगे-पाटणकर
भंडारा- गोंदिया एन.के. नान्हे
गडचिरोली- चिमूर डॉ. रमेश गजबे
चंद्रपूर – अॅड. राजेंद्र महाडोळे
यवतमाळ-वाशीम  – प्रा. प्रवीण पवार
बुलडाणा – बळीराम सिरस्कार
अमरावती – गुणवंत देवपारे
हिंगोली – मोहन राठोड
नांदेड – प्रा. यशपाल भिंगे
परभणी – आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
बीड – प्रा. विष्णू जाधव
उस्मानाबाद – अर्जुन सलगर
लातूर – राम गारकर
जळगाव – सौ. अंजली रत्नाकर बावीस्कर
रावेर – नितीन कांडेलकर
जालना – डॉ. शरदचंद्र वानखेडे
रायगड – सुमन कोळी
पुणे – अनिल जाधव
बारामती – नवनाथ पडळकर
माढा – अॅड. विजय मोरे
सांगली – जयसिंग शेंडगे
सातारा – सहदेव ढवळे
रत्नागिरी – सिंधुदुर्ग – मारुती रामचंद्र जोशी
कोल्हापूर – डॉ. अरुणा माळी
हातकणंगले – अस्लम बादशहाजी सय्यद
नंदुरबार – दाजमल गजमल मोरे
दिंडोरी – बापू केळू बर्डे
नाशिक – पवन पवार
पालघर – सुरेश अर्जुन पडवी
भिवंडी – डॉ. ए.डी. सावंत
ठाणे – मल्लिकार्जुन पुजारी
मुंबई दक्षिण – डॉ. अनिल कुमार
मुंबई दक्षिण मध्य – डॉ. संजय भोसले
ईशान्य मुंबई – संभाजी शिवाजी काशीद
मावळ – राजाराम पाटील
शिर्डी – डॉ. अरुण साबळे