ऐश्वर्या रायचे वादग्रस्त मीम शेअर केल्यानंतर विवेक ओबेरॉयचा माफीनामा

147

मुंबई | ऐश्वर्या राय, सलमान खान, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चनच्या फोटोंचा वापर करुन तयार करण्यात आलेले मीम विवेक ओबेरॉयने शेअर केले होते. यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. याप्रकरणी त्याने माफी मागावी असे बोलले जात होते. मात्र यावर त्याने चोर तर चोर वरुन शिरजोर अशी भूमिका घेत. मी चूक केली नाही तर मी माफी का मागू अशी भूमिका घेतली होती. मात्र नंतर लोकांचा राग आणि महिला आयोगाची सक्रियता पाहून मंगळवारी हात जोडले. त्यांने 24 तासांच्या आत माफी मागून हे वादग्रस्त ट्विट डिलीट केले आहे.

विवेकने मंगळवारी ट्विट डिलीट करुन दोन नवीन ट्विट केले आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, “अनेक वेळा आपल्याला जे फनी आणि कुणालाही दुःख देणारे नाही असे वाटते, ते सर्वांनाच तसे वाटत नाही. मी 10 वर्षात जवळपास दोन हजार मुलींच्या भविष्यासाठी चांगले काम केले आहे. मी एखाद्या महिलेचा अपमान करण्याविषयी विचारही करु शकत नाही.

तर दूसऱ्या ट्विटमध्ये विवेक ओबेरॉय म्हणाला की, ‘माझ्या मीममुळे एखाद्या महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, ट्विट डिलिटेड’

काय होते प्रकरण

अभिनेता विवेक ओबेरॉयने आज आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक, आराध्यासोबतचे तीन फोटोज होते. सलमान, ऐश्वर्याच्या फोटोवर ‘ओपिनियन पोल’ लिहिले होते, ऐश्वर्या विवेकच्या फोटोवर ‘एक्झिट पोल’ लिहिले होते, तर नवरा अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतच्या फोटोवर ‘रिजल्ट्स’ असे लिहिले होते. मात्र विवेकचे हे ट्विट आल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती.