विजय मल्ल्या अखेर फरार घोषित, संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा

मुंबई | उद्योगपती विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आले आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाला त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झालाय. अनेक बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून तो भारताबाहेर पळून गेला होता. नव्या कायद्यांतर्गत फरार घोषित करण्यात आलेला मल्ल्या हा पहिलाच उद्योगपती ठरलाय.