ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावली

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कादर खान हे मुलगा आणि सुनेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून कॅनडात आहेत. व्हेंटिलेटर लावण्यात आले असल्याची माहिती कादर खान यांचा मुलगा सरफराज खान यांनी दिली आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी असून श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.