नितीन गडकरी आणि अॅक्टर विवेक ओबेरॉयने ‘पीएम नरेंद्र मोदी’चे पोस्टर केले लॉन्च

20

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’चे पोस्ट लॉन्च केले आहे. आज दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी विवेक ओबेरॉयने सांगितले की, हा सिनेमा 24 मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होताना मला खूप विरोध झाला असल्याचेही त्याने सांगितले.

 

पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा 24 मे रोजी रिलीज होतोय. या सिनेमात विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा उमंग कुमारने दिग्दर्शित केला आहे. उमंग कुमार यांनी यापूर्वी ‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’ सारखे सिनेमे डायरेक्ट केले आहे. सिनेमाचा ट्रेलरही ऑनलाइन रिलीज करण्यात आला होता. या सिनेमात मोदींच्या बालपणापासून त्यांच्या पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.