ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना सुनावले

मुंबई | “ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना सुनावले आहे. शिवसेनेचे खासदार आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच मातोश्रीमध्ये बैठक झाली. बैठकित लोकसभेसाठी भाजपसोबत युती न करण्याचा पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे. यावेळी युती झाली नाही तर निवडून न येण्याची भीती काही खासदारांनी व्यक्त केली. यावर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची चांगलीच कानउघडणी केली. “भीती वाटत असेल, तर निवडणूक लढवू नका”, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी खासदारांना सुनावले. यासोबतच युतीची शक्यता मावळल्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.