अखेर शबरीमला मंदिरात महिलांनी केला प्रवेश

अखेर केरळच्या शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करत पूजा केली आहे. या महिलांचे वय 40 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावं आहेत. याचा व्हिडिओही समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतरही शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास भाविक मोठा विरोध करत होते. मात्र अखेर महिलांनी प्रवेश मिळवला आहे.

दरम्यान, या महिलांच्या दाव्यानंतर आता भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आले आहे. तसचं मंदिराचे शुद्धीकरण देखील करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.