शोपियांमधील चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू

एएम न्यूज नेटवर्क । दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी सकाळी लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गहंड परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसलेले असल्याची सूचना सैन्याला मिळाली होती. सैन्याच्या जवानांनी दहशतवाद्यांना चहुबाजूंनी घेरून कारवाई केली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू आहे.

वृत्तसंस्थेनुसार, सुरक्षा दलांना दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होीत. यानंतर सैन्याने परिसराची घेराबंदी करून शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत होते तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. अधिकारी म्हणाले की, सैन्याने प्रत्युत्तराच्या कारवाईत गोळीबार केला.