हिंगोलीत क्रेनचा वायर तटुल्याने 2 मजूर गंभीर, विहिरीतील दगड काढताना दुर्घटना

हिंगोली | क्रेनची वायर तुटल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले आहे. डिग्रस कराळे गावात विहिरीतील दगड आणि माती बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येत होता. यावेळी एक मोठा दगड बाहेर काढत असताना क्रेनचा वायर तुटल्याने दगड खाली पडला. या दुर्घटनेत बाळू घोंगडे आणि मारुती गिरी जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडमधील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेय. या घटनेची पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नाही.