राहुल गांधींच्या ‘मसूदजी’वरील टीकेला काँग्रेसचे ‘हाफीज जी’ने प्रत्युत्तर, पोस्ट केला या भाजप नेत्याचा व्हिडिओ

1

एएम न्यूज नेटवर्क | राहुल गांधींनी भाजपवर टीका करताना दहशतवादी मसूद अझहरचा उल्लेख मसूद अझहरजी केला. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर राहुल गांधींना चांगलेच ट्रोल करण्यात आले. भाजप नेत्यांनीही या मुद्द्यावरून प्रतिक्रिया द्यायला उशीर केला नाही. कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही ट्विट करत राहुल गांधींचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यांना चिमटा काढला. पण आता काँग्रेसने या प्रकाराला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रवीशंकर प्रसाद यांचाच एक व्हिडिओ पोस्ट करून टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. या व्हिडिओमध्ये रवीशंकर प्रसाद दहशतवादी हाफीज सईदचा उल्लेख हाफीजजी असा करत आहेत. भाजपने त्यांच्या खास वेद प्रताप वैदिक यांना पाकिस्तानात हाफिजची गळाभेट घ्यायला पाठवले होते, असेही प्रियंका यांनी म्हटले आहे.

रवीशंकर प्रसाद यांनी ट्विट केलेला राहुल गांधींचा व्हिडिओ..

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केलेला रवीशंकर प्रसाद यांचा व्हिडिओ..