गोंदियामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

गोंदिया | गोंदिया-आमगाव राज्यमार्गावर ट्रक आणि ट्रॅक्टरदरम्यान भीषण अपघात झाला आहे. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ट्रॅक्टरचालक मोरेश्वर हिरालाल कटरे(वय 28) आणि हमाल प्रविण कुंभरे अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी 8च्या सुमारास खमारीगावाजवळील नाल्याजवळ हा अपघात झाला. ट्रकमध्ये लोखंडी सळाया तर ट्रॅक्टरमध्ये वाळू होती. नाल्याजवळील वळणावर ट्रक आणि ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटले. यात ट्रॅक्टरच्या इंजिनवर ट्रक आदळून ट्रॅक्टरवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.