भारतात टिक-टॉकला बंदी, प्ले स्टोरवरुन अॅप हटवण्याचे केंद्र सरकारचे आदेश

नवी दिल्ली | आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले अॅप अर्थात टीक-टॉक अॅप आता बंद होणार आहे. ‘टिक टॉक’ या मोबाईल व्हिडीओ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी दिले होते. यानंतर आता केंद्र सरकारने गुगल आणि अॅपल कंपनीला टिक-टॉक अॅप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. प्ले स्टोरवरुन हे अॅप आता हटवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून टिक-टॉकचे वेड हे वाढत चालले आहे. सोशल मीडियावर टिक-टॉक व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. टिक-टॉक या अॅपच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ तयार केले जातात. यामध्ये अनेक अश्लील व्हिडिओ तयार होत आहेत. टिक-टॉक व्हिडिओचा गैरवापर होत आहे. तसेच त्यावर अश्लील कन्टेंट अपलोड केला जात असल्यामुळे यावर बंदी यावी यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर मद्रास हायकोर्टाने टीक-टॉकवर बंदी आणली. आता या बंदीवर स्थगिती आणण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.