मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव कंटेनरची टेम्पोला धडक, भीषण अपघातात 3 जण ठार

नाशिक । मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगावजवळ कंटेनर-टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कंटेनरने टेम्पोला जोरदार धडक दिली. यात टेम्पोचा चेंदामेंदा झाला, तर कंटेनरही उलटला.

अपघातातील मृतांची ओळख अद्याप होऊ शकलेली नाही. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.