थंडीने घेतला हजार कोंबड्यांचा बळी, लातूरमधील मुजावर कुटुंबीय रस्त्यावर

लातूर | आटोळा येथे कडाक्याच्या थंडीने हजारो कोंबड्यांचा बळी घेतला आहे. शेतकरी हुसेन मुजावर यांच्या 1 हजार कोंबड्यांचा 27 जानेवारी रोजी एकाच रात्रीत मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालातही कोंबड्यांचा मृत्यू थंडीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 3 महिन्यांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून मुजावर कुटुंबीयांनी कुक्कुटपालन सुरु केले होते. यासाठी त्यांनी 1200 कोंबड्या खरेदी केल्या. हजारो रूपये खर्च करून शेड उभा केला. अडीच महिन्यात कोंबड्या सरासरी अडीच किलोच्या झाल्या होत्या. सध्याच्या बाजारभावानूसार, 200 रूपये प्रतिकिलोने कोंबड्यांची विक्री होऊन 5 लाखांच्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा होती. मात्र थंडीच्या लाटेने मुजावर कुटुंबियांचे स्वप्न धुळीला मिळाले. एकाच रात्रीत त्यांच्या 1200 कोंबड्यांपैकी हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.