‘द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर प्रदर्शित

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमातून मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. संजय बारू हे मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते.

सिनेमात मनमोहन सिंग आणि गांधी घराण्यातील संघर्ष दाखवला आहे. ट्रेलरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तिरेखा दिसत आहेत. विशेष म्हणजे, ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यामुळं यावरून राजकारण रंगणार असे दिसत आहे.