लेफ्टनंट कर्नल एमएस धोनीने टीमला दिली आर्मी कॅप, टीम इंडियाने शहिदांना असे केले अभिवादन

2

स्पोर्ट्स वर्ल्ड | पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी टीम इंडियाचा आज आर्मी कॅप परिधान करून मैदानात उतरली. रांचीतील ऑस्ट्रेलियाविरोधीत तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाने आर्मी कॅप परिधान केली. धोनीला भारतीय लष्कराकडून मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेले आहे. त्यानेच स्वतः संपूर्ण टीमला त्याच्या हस्ते या कॅपचे वाटप केले. या सामन्याचे मानधनही शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचे टीम इंडियाने जाहीर केले.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. टीम इंडियानेही रांचीतील वन डे सामन्यात खास स्टाइलने शहीद जवानांना अभिवादन केले. भारताचा संपूर्ण संघच आज मैदानात उतरला तो आर्मी कॅप परिधान करून. लेफ्टनंट कर्नल पद असलेला माजी कर्णधार आणि रांचीचा लोकल बॉय महेंद्रसिंह धोनी याच्या हस्ते सर्वांना या कॅपचे वाटप करण्यात आले. तसेच या सामन्याचे मानधन शहीदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

कॉमेंटेटर्सनेही परिधान केली कॅप

दरम्यान, कॉमेंटेटर्सच्या रूममध्येही देशभक्तीचा हा ज्वर पाहायला मिळाला. सर्व कॉमेंटेटर्सनेही सामना सुरू होण्यापूर्वी आर्मी कॅप परिधान केली. यावेळी सुनील गावस्करने सर्वांना या कॅपचे वाटप केले. हर्षा भोगले, संजय मांजरेकर, मुरली कार्तिक यांनी ही कॅप परिधान केली.

महिला दिनाच्या शुभेच्छा

सामन्यापूर्वी बीसीसीआयच्या वतीने आज महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छाही देण्यात आल्या. गुलाबी रंगाचे अनेक फुगे हवेत सोडून सर्व महिलांना महिला दिनाच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या.