धोनीने दिली टीम इंडियाला ट्रीट, केदार-पंतसह क्रिकेटर्सना घडवली हमरची सफर

0

रांची | भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा सामना धोनीच्या घरच्या मैदानावर म्हणजे रांचीत होत आहे. त्यासाठी रांचीत पोहोचलेल्या टीम इंडियाला धोनीने त्याच्या घरी पार्टी दिली. बुधवारी टीम इंडियाचे सर्व प्लेयर धोनीच्या घरी पोहोचले होते. याठिकाणी सर्वांनी मस्ती करत डीनन एन्जॉय केले. धोनीने स्वतः केदार जाधव आणि ऋषभ पंतसह टीम इंडियातील प्लेयर्सना त्याच्या हमरची सफर घडवत घरी नेले.

ऑस्ट्रेलिया विरोधातील वन डे मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याच्या होम पिचवर म्हणजे रांची येथे होतोय. या सामन्यासाठी रांचीत पोहोचलेल्या टीम इंडियासाठी माहीने बुधवारी त्याच्या घरी मेजवानीचे आयोजन केले होते. यावेळी कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांच्यासह संपूर्ण संघ धोनीच्या घरी गेला होता. धोनीच्या घरी या पार्टीसाठी खास आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियातील सर्वच खेळाडुंनी आणि स्टाफने यावेळी धमाल केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान एअरपोर्टवरून धोनीने त्याच्या खास हमर गाडीत केदार जाधव आणि ऋषभ पंतसह इतर खेळाडुंना सफर घडवली.