वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, असा आहे भारतीय संघ

एएम स्पोर्ट्स । भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) सोमवारी वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय क्रिकेट टीमची घोषणा केली आहे. विराट कोहली कर्णधार असून, रोहित शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनी विकेटकीपरच्या भूमिकेत असेल. चौथ्या स्थानासाठी अंबाती रायडूची निवड झाली नाही.

असा आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल. राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी.

अष्टपैलू असल्याने जडेजा महत्त्वाचा

मुख्य निवडकर्ते एम.एस.के. प्रसाद म्हणाले, “अनेक परिस्थितींमध्ये संघाला अष्टपैलूची गरज भासते. यामुळे जडेजा संघासाठी महत्ताचा आहे. तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही रायडूला काही संधी दिल्या, परंतु विजय शंकर गोलंदाजीही करू शकतो, तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे.”