शिक्षिकेची 5 वर्षांच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

1

नाशिक | येथील किझी प्ले स्कुलमध्ये शिक्षिकेने चिमुरड्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीची सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली. यानंतर गंगापूर पोलिसांत चिमुरड्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, चिमुरडा आजारी होता त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्यात. राटकर असे त्या शिक्षिकेचे नाव असल्याची माहिती समोर येते आहे.

किझी प्ले स्कुलमध्ये हा प्रकार घडला. श्रेयस पवार असे या 5 वर्षाच्या चिमुरड्याचे नाव आहे. तो नर्सरीच्या वर्गातील विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याला वर्गशिक्षिकेने मारहाण केल्याने पालक चिंतेत आहेत. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने उघडकीस आला.