भाजपाचा झेंडा हातात घेऊन सुजय विखे अहमदनगरमध्ये दाखल, नगरवासीयांकडून जोरदार स्वागत

अहमदनगर | राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. आता सुजय विखे पाटील पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा घेऊन अहमदनगरमध्ये दाखल झाले आहे. येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र त्यांच्या हालचालींना यश आले नाही. यानंतर सुजय विखे पाटील यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागतही केले. यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. यानंतर आता ते पहिल्यांदाच अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ सुजय विखे आज नगर मध्ये दाखल झाले. विखे परिवार राजकारणासोबतच शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात स्थिरस्थावर असून हीच विखे परिवाराची मोठी ताकत आहे. नगर शहराजवळच विखे फाउंडेशनचे विळद घाटात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल असून या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यां सोबत बैठक सुरू केली आहे. डॉ सुजय आज प्रचाराच्या दृष्टीने रणनीती आखणार आहेत.