गडचिरोलीः एसटीला अपघात, 6 विद्यार्थी ठार

संतप्त गावकऱ्यांनी पेटवले 15 ट्रक

गडचिरोली | जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 9 जण गंभीर जखमी झाले. एटापल्लीपासून पाच किमी अंतरावरील गुरुपल्ली गावाजवळ सकाळी हा अपघात झाला. बसला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी या मार्गावरील 15 ट्रक पेटवून दिल्याची माहिती आहे. ज्या ट्रकने बसला धडक दिली तो एका खाण कंपनीचा होता. जखमींना एटापल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.