जागतिक महिलादिनी गुगलचा नारीशक्तीला सलाम, तयार केले खास ‘डूडल’

2

एएम न्यूज नेटवर्क | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गुगलने नारीशक्तीला खास सलाम केला आहे. गुगलने महिला दिनाचे खास डूडल तयार करून जगभरातील महिलांना महिला दिनाची खास भेट दिली आहे.

जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. याचेच औचित्य साधून गुगलने महिलांसाठी ही भेट गिली आहे.

जगभरातील भाषांचा वापर

गुगलने तयार केलेल्या या खास डूडलवर जगभरातील विविध भाषांमध्ये महिलांना काय म्हटले जाते याचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे इंग्रजीत वुमेन हिंदी किंवा मराठीत महिला अशाप्रकारे विविध भाषांत महिलांसाठी वापरले जाणारे शब्द या डूडलवर आहेत.