उत्तर प्रदेशच्या आघाडीत काँग्रेसला स्थान नाही, लवकरच जागावाटपाचा निर्णय

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये भाजप विरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी आघाडी केली आहे. या आघाडीपासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आले आहे. मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये ही आघाडी निवडणूक लढवणार नाही. दिल्लीत बसपा अध्यक्ष मायावती आणि सपा नेते आखिलेश यादव यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीचा निर्णय घेण्यात आला. जागा वाटपांवर अंतिम निर्णय 15 जानेवारीनंतर घेतला जाणार आहे.