सौंदर्याचा लग्न सोहळा ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये, सुपरस्टार रजनीकांत झाले भावुक

soundarya rajnikanth

नवी दिल्ली | सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या रजनीकांतचा शाही विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला.  ट्विटवर हा लग्न सोहळा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. विशगन वगनमुडीसोबत ती साताजन्माच्या गाठीत अडकली. सौंदर्याचे हे दुसरे लग्न आहे. सौंदर्याच्या संगीत आणि मेंदी सेरेमनीचे फोटोही व्हायरल होत आहेत. या आनंदाच्या प्रसंगी सुपरस्टार रजनीकांत यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी डान्स फ्लोरवर ठेका धरुन आनंद व्यक्त केला. तर चैन्नईमध्ये दोघांचा लग्न सोहळा संपन्न झाला. एएनआयने सौंदर्या रजनीकांतच्या लग्नाचे फोटोज जारी केले आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत लेकीच्या लग्नात भावूक झालेले दिसले.