सिंदखेड राजा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी पाहायला मिळणार तिरंगी लढत

3

सिंदखेड राजा | येथील नगरपालिकेमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची युती असून भाजप सेना यांच्यामध्ये सुद्धा युती झालेली आहे. तर वंचित आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्यामुळे सिंदखेड राजा नगराध्यक्षपदासाठी आता तिरंगी लढत ही पाहावयास मिळेल. शिवसेना-भाजपकडून सतीश तायडे हे रिंगणात आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे देविदास ठाकरे हेसुध्दा रिंगणात आहेत. भारिप-बमसं व आघाडीचे सुधाकर चौधरी यांनी अर्ज कायम ठेवल्यामुळे आता सिंदखेड राजा नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.

एकूण नगराध्यक्षपदासाठी 3 तर सदस्य पदासाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. 24 मार्च रोजी ही निवडणूक होणार होणार आहे 17 सदस्य पदासाठी ही निवडणूक होईल. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश बोंद्रे हे बिनविरोध निवडून आले आहेत. सिंदखेड राजा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीने आपले खाते उघडले असून त्यांचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे आता उर्वरित जागांसाठी मोठ्या प्रमाणात चुरशीची निवडणूक होताना दिसणार आहे. विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर व माजी आरोग्यमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामध्ये डॉक्टर शिंगणे हे लोकसभेचे उमेदवार असल्यामुळे या निवडणुकीत अजूनच रंग भरल्या जाणार आहे . तर 25 मार्चला जिजाऊ नगरी सिंदखेडराजाचे नगराध्यक्ष कोण हे समजणार आहे.