‘अल्टीमेटम’ हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाही, संजय राऊत यांनी भाजपला सुनावले खडेबोल

मुंबई | अमित शाह यांनी युतीसाठी अल्टीमेटम दिल्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने भाजपची कानउघाडणी केली आहे. अल्टीमेटम हा शब्द आमच्या डिक्शनरीतच नाही. आम्हाला अल्टीमेटम देणारा राजकारणात कोणीही नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे. स्वबळावर लढण्याची शिवसेनेची भूमिका ठाम आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केल आहे.