पाकिस्तानात क्रिकेटपटू पंतप्रधान झाला अन् आपल्याकडे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष – उद्धव

2

नागपूर | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा अमरावतीपाठोपाठ नागपुरातही कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे, नितीन गडकरी तसेच देवेंद्र फडणवीसांसह शिवसेना आणि भाजममधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक विकास कामे केल्याचा दावा यावेळी सर्वांनी केला. त्याचबरोबर विरोधकांवर टीकेची झोडही उठवली.

UPDATES
कोण काय म्हणाले..

देवेंद्र फडणवीस
— येणारी निवडणूक देशाला वेगळ्या वळणावर नेणारी आहे.
— गेल्या पाच वर्षांत विकासाची अनेक कामे केली. गरिबांसाठी अनेक योजना आखल्या.
— निर्णय न घेणारे सरकार आपण पाहिले आणि आता सर्वात गतिमान सरकारही आपण पाहत आहोत.
— पूर्वी किती पैसे लोकांपर्यंत पोहोचायचे, हे राजीव गांधीजी यांनीच आपल्या सर्वांना सांगितले आहे; पण आम्ही पैसे खाणाऱ्यांनाच सिस्टिममधून बाहेर काढले.
— 5 वर्षांत सर्वकाही होणार नाही, पण 50 वर्षांत जे झाले नाही ते केल्याचा आमचा दावा आहे. उरलेली कामेही आगामी काळात होणार आहेत.
— महाराष्ट्रात ५ लाख घरे झाली. आणखी ५ लाख घरे निर्माणाधीन आहेत. शेतकऱ्यांना विक्रमी मदत राज्यात आणि देशात मिळाली. पंतप्रधान पीकविमा योजना, शेतकरी सन्मान कल्याण निधी यातून शेतकऱ्यांचे कल्याण साधले जात आहे.
— कामगारांना ३००० रुपये पेन्शन देण्याची योजना याच सरकारने जाहीर केली आणि अमलात आणली. शेवटचा शेतकरी लाभान्वित होत नाही, तोवर कर्जमाफीची योजना सुरूच राहील, हे आम्ही आधीच सांगितले आहे.
— मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्ते निर्मिती होत आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येत आहे. विदर्भ-मराठवाड्यात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत.
— काही लोक पुरावे मागतात, हे दुर्दैवी आहे. एकीकडे पुरावे मागायचे आणि दुसरीकडे अतिरेक्यांना ‘जी‘ लावायचे. साराच प्रकार दुर्दैवी आहे.
— होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण आमचे हिंदुत्व संकुचित नाही. ते सर्वसमावेशक आहे. २०१४ मध्ये विदर्भाची मॅच आपण १०-० ने जिंकलो. यावेळीसुद्धा असाच स्कोअर असला पाहिजे.

नितीन गडकरी 
— रामराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांना जोमाने काम करायचे आहे.
— आम्ही जे सांगितलं ते केलं आणि जे केलं तेच सांगितले.
— पवार फार हुशार राजकारणी आहेत, त्यांना माहिती आहे की यावेळी काही जमण्यासारखे नाही त्यामुळे त्यांनी यशस्वी माघार घेतली.
— सिंचनाची कामे गेल्या 25 वर्षांत जेवढी झाली नाहीत, तेवढी या 5 वर्षांत देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाली.

उद्धव ठाकरे 
— जे चांगले आहे त्याला चांगले म्हणणे, आणि चूक दाखवून देणे ही आमची परंपरा आहे.
— ज्यांच्यावर जास्त प्रेम असते त्यांच्याकडून काही गैर घडले तर जास्त वाईट वाटते.
— जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण आणि जिथे कमळ असेल तिथे कमळ, दुसरी निशाणी पाहायची नाही.
— कार्यकर्त्यांनी बूथप्रमाणे काम करणे अत्यंत गरजेचे आहे.
— आपण केलेली कामे लोकांपर्यंच पोहोचवायला हवी.
— आपण करून दाखवलेलं काम लोकांना दाखवले तरी आपण निवडणूक जिंकू.
— शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आमचा संघर्ष झाला, पण सर्व मुद्दे सोडवण्यात यश आले.
— देशाची निवडणूक आहे याचा विचार करून मी निर्णय घेतला.
— पाकिस्तानात खेळाडू पंतप्रधान झाला, पण आपल्याकडे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला.
— युती दिलखुलासपणे केलीय, मनापासून केलीय. दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या युतीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

पाहा Live Video..

भाजप – शिवसेना संयुक्त महामेळावा, नागपूर

BJP Maharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 15, 2019