दीक्षित म्हणाल्या, दहशतवादाला मनमोहनसिंग यांनी मोदींएवढे ठोस प्रत्युत्तर दिले नाही..

0

नवी दिल्ली | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित त्यांच्या एका वक्तव्याने वादात अडकल्या आहेत. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना दहशतावादावर त्यांचे प्रत्युत्तर पंतप्रधान मोदींएवढे आक्रमक नव्हते, असे दीक्षित म्हणाल्या आहेत. त्याचवेळी मोदी हे सर्वकाही राजकारणासाठी करत असल्याचेही शीला दिक्षित म्हणाल्या.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना शीला दीक्षित यांनी यासंदर्भात वक्तव्य केल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रखरतेने पुलवामा हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली तसे मनमोहन सिंग यांनी 26/11 च्या हल्ल्यानंतर केले नव्हते, असे शीला दीक्षित म्हणाल्या आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे सर्वकाही राजकारणासाठी करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

चुकीचा अर्थ घेतला..

दरम्यान यासंदर्भात शीला दिक्षित यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या बोलण्याचा चुकीचा संदर्भ काढला जात असेल तर मी त्याला काहीही करू शकत नाही.