अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उसळी

सेन्सेक्सची 112 अंकानी उसळी, निफ्टीही 31 अकांनी वधारला

नवी दिल्ली | बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातही उत्साह पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडल्यानंतर काही वेळातच शेअर बाजारानं उसळी घेतलीये. सेन्सेक्समध्ये 112 अंकाची वाढ झालीये. तर निफ्टीही 31 अकांनी वधारलाय. सध्या सेन्सेक्स 36 हजार 379 अंकावर आहे. तर निफ्टी 10 हजार 862 अंकावर पोहोचलाय. नोटाबंदीने होरपळलेल्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी बजेटमध्ये काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीये. यामुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.