राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत मावळमधून पार्थच्या नावाची घोषणा, शिरूरमधून अमोल कोल्हेंचे नाव

1

एएम न्यूज नेटवर्क | लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवारच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर शिरूरमधून अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत या नावांची घोषणा केली.

अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी

दिंडोरी – धनराज महाले
मावळ – पार्थ पवार
शिरूर – डॉ. अमोल कोल्हे
बीड – बजरंग सोनवणे
नशिक – समीर भुजबळ

पार्थच्या लोकप्रियतेचा फायदा

पार्थ पवारच्या मावळमधील उमेदवारी बाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पार्थने गेल्या काही दिवसांत मतदारसंघात चांगला जम बसवला आहे. कार्यकर्त्यांमधून त्यांना तिकिट देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल, असेही पाटील म्हणाले.

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 15, 2019