ऊर्मिलाच्या प्रचार रॅलीत भाजपच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, जिवाला धोका असल्याची ऊर्मिलाची पोलिसांत तक्रार

मुंबई | उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकरच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाली. ऊर्मिला मातोंडकरांची प्रचार रॅली सुरू होती. यादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना तुटून पडले. यानंतर ऊर्मिलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ऊर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, हे सर्व भीती निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे. ही एक सुरुवात आहे, हे पुढे जाऊन हिंसेचे रूप घेऊ शकते. ऊर्मिला म्हणाली की, ‘माझ्या जिवाला धोका आहे, मी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सुरक्षेसाठी मागणी केली आहे.’

उर्मिला सोमवारी आपल्या समर्थकांसोबत निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाली होती. बोरीवलीमध्ये तिचे समर्थक प्रचार करत होते. यादरम्यान भाजपचे उमेदवार गोपाल शट्टीचे समर्थकही तिथे पोहोचले. त्यांनी उर्मिलाच्या प्रचार रॅलीमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. यानंतर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हा गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली.

ऊर्मिलाने केली पोलिसांत तक्रार

या घटनेनंतर ऊर्मिलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने सांगितले आहे. तिने पोलिसांकडे सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. उर्मिला म्हणाली की, ‘हे सर्व भीती निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे. ही एक सुरुवात आहे, नंतर हे हिंसेचे रुप धारण करु शकते. माझ्या जीवाला धोका आहे. मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि सुरक्षा मागितली आहे.’