संभाजी ब्रिगेड उतरणार लोकसभेच्या रणांगणात, पुणे-बुलडाणासह 4 जागांची केली मागणी

0

औरंगाबाद | राजकीय पक्ष म्हणून स्थापना झालेल्या संभाजी ब्रिगेडने लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी संदर्भात बोलणी सुरू असून त्यांच्याकडे संभाजी ब्रिगेडने 4 जागांची मागणी केली आहे. मात्र त्यांना जागा न मिळाल्यास राज्यभरात 18-20 जागा स्वबळावर लढवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी आमच्या काही बैठका झाल्या आहेत. त्यात आम्ही किमान चार जागांवर अडून आहोत. आम्ही बुलडाणा, पुणे आणि वर्धा या जागांची मागणी केली आहे. तसेच विधानसभेसाठी काही तरी ठोस आश्वासन देण्याची मागणी केली आहे. तसे झाल्यास आघाडीबरोबर जाण्यास तयार असल्याचे भानुसे म्हणाले. पण काँग्रेसने हे मान्य केले नाही तर आम्ही राज्यभरात 17-18 ठिकाणी स्वबळावर लढणार आहोत. पण आम्हाला किमान दोन जागा दिल्या तर आम्ही इतर ठिकाणी आघाडीला पाठिंबा देऊ असे भानुसे म्हणाले आहेत.