‘ठाकरे’ सिनेमाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

महाराष्ट्रात ‘ठाकरे’ प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा

मुंबई | बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात चप्पल घालून पुष्पहार अर्पण करताना दिसतोय, असा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतलाय. हा संभाजी महाराजांचा अपमान आहे, सिनेमातून हे दृश्य ताबडतोब काढून टाकावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. अन्यथा राज्यात एकाही ठिकाणी सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी दिलाय.