‘साहेब, निर्णयाचा पुनर्विचार करा’, लोकसभा न लढवण्याच्या निर्णयानंतर पवारांच्या दुसऱ्या नातवाची फेसबूक पोस्ट

2

एएम न्यूज नेटवर्क | आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत शरद पवारांनी सोमवारी दिले. सोमवारच्या पत्रकार परिषदेत पवारांनी एका कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवायची असे म्हणत ते लोकसभेच्या रणांगणात उतरणार नसल्याचे म्हटले. त्यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीचेही संकेत दिले. पण एका नातवासाठी शरद पवारांनी माघार घेतली असताना त्यांचा दुसरा नातू रोहित पवार याने शरद पवारांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गळ घातली आहे.

काय म्हणाले रोहित पवार..

रोहित पवार यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांच्या 52 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. यावेळी रोहित पवार यांनी म्हटले की,
एक कार्यकर्ता म्हणून,
“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाचं हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”

राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं…

Rohit Rajendra Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 11, 2019

इशारा कोणाला…

या पोस्टमध्ये रोहित पवारांनी, शरद पवारांबाबत वक्तव्ये करणाऱ्याला नाव न घेता इशाराही दिला.
‘..बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.’
असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. शरद पवारांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना हवेचा कल समजतो त्यामुळेच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचा चिमटा काढला होता. त्यांनाच रोहित पवारांनी इशारा दिल्याची चर्चा आहे.