आईसह ईडीसमोर हजर झाले रॉबर्ट वाड्रा, सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट.. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या, चौकीदार चोर है.. च्या घोषणा

जयपूर | प्रियंका गांधींचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वाड्रा मंगळवारी आईसह जयपूरमध्ये अंमलबजावणी संचलनासमोर हजर झाले. यावेळी प्रियंका गांधीही त्यांच्याबरोबर होत्या. एका जमीन घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी ते ईडीसमोर हजर झाले आहेत. त्यापूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये वाड्रा यांनी सरकारवर आरोप केले आहेत. केवळ माझी आई माझ्याबरोबर राहते त्यामुळे तिलाही प्रकरणात आरोपी बनवून सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप वाड्रा यांनी केला आहे.

चौकीदार चोर है.. च्या घोषणा

रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई मौरीन वाड्रा यांची जयपूर येथे अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यावेळी ईडीच्या ऑफिसबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी ‘प्रियांका गांधी जिंदाबाद’ आणि ‘चौकिदार चोर है’ अशा घोषणा दिल्या.

वाड्रांनी केली भावुक पोस्ट

रॉबर्ट वाड्रा यांनी कोर्टात हजर होण्याच्या काही वेळा पूर्वी फेसबूकवर एक बावुक पोस्ट केली. यात वाड्रांनी म्हटले की, सरकार माझ्या वयस्कर आईबरोबर सुडाच्या भावनेने का वागत आहे हेच कळत नाही. पुढे त्यांनी लिहिले की, माझ्या आईने गेल्या काही दिवसांत तीन अगदी जवळची माणसे गमावली आहेत. पण अशा परिस्थितीतही केवळ माझ्याबरोबर राहत असल्याने तिला आरोपी बनवण्यात आले. जर खरंच माझ्या आईची भूमिका संशयास्पद होती तर तिच्याविरोधात प्रकरण दाखल करण्यास चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी का लागला असा सवालही वाड्रांनी उपस्थित केला.