कोरेगाव भीमा येथे पादचारी महिला भरधाव वाहनाच्या धडकेत ठार

0

पुणे | पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथे एका पादचारी महिलेचा वाहन धडकेत मृत्यू झाला आहे. बिनादेवी हरिचंद्र रॉय असे या मृत महिलेचे नाव आहे. कोरेगाव भीमा येथे ही महिला राहत होती. सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली. या धडकेत बिनादेवी यांना जागीच प्राण गमवावे लागले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढली तपास सुरू आहे.