लवकरच बाजारात येणार 20 रुपयांची नवी नोट

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व बॅंकेनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआय लवकरच 20 रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. या नोटेमध्ये अतिरिक्त फीचर असणार आहे. नोटाबंदीनंतर आतापर्यंत 10, 50, 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटा चलनात आणल्या आहेत.

आरबीआयच्या माहितीनुसार, मार्च 2018मध्ये देशात 20 रुपयांच्या 10 कोटींच्या नोटा चलनात होत्या. मार्च 2016मध्ये 4.92 कोटींच्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता.