राहूल गांधी हे खोटं बोलण्याचे मशीन, राफेल नाही तर एअरबस संबंधित आहे ईमेल; केंद्रीय मंत्री रविशंकर यांचा पलटवार

नवी दिल्ली | राहुल गांधींनी मंगळवारी पुन्हा एकदा मोदी सरकारला राफेलवरून धारेवर धरले. अनिल अंबानी यांना राफेल कराराविषयी 10 दिवसांपूर्वीच माहिती होते. पंतप्रधान त्यांचे मध्यस्थी म्हणून काम करत असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या आरोपांचे खंडन करत राहुल गांधीं खोटं बोलत असल्याचे सांगितले.

राफेल डीलवरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदींंवर एकापाठोपाठ हल्ले सुरुच ठेवले आहेत. मंगळवारी पुन्हा त्यांनी असाच हल्लाबोल केला त्याला केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आरोपांचे खंडन केले. राहूल गांधी खोटे बोलण्याचे मशीन असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच तो मेल त्यांच्याकडे आलाच कसा असा प्रतिप्रश्नही रविशंकर यांनी केला.

राहुल गांधी लॉबिस्ट

राहुल यांच्याकडील मेल राफेल संबंधी नाही तर एअरबस संबंधी आहे. राहुल गांधी खोटे बोलण्याची मशीन असून त्यांनी पंतप्रधानांवर आरोप लावण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे ते म्हणाले. दरम्यान राहुल गांधी काही कंपन्यांसाठी लॉबिस्ट म्हणून काम करत असल्याचा आरोप रविशंकर यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, राहूल गांधी यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. गांधी परिवार आजवर देशाला लुटत आला आहे. सध्या सोनिया आणि राहुल दोघेही जामिनावर आहेत, असेही प्रसाद म्हणाले.