बीडमध्ये न्यायालयातून पळाला आरोपी, तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

आरोपीवर आहे बलात्काराचा गुन्हा

बीड | न्यायालयातून आरोपी पळाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून धूम ठोकली आहे. अनिल पवार असं आरोपीचं नाव आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आरोपी अनिल पवारला आज न्यायालयात हजर करण्यात आल होतं. यादरम्यान पोलिसाच्या हाताला हिसका देउन तो फरार झाला. या घटनेमुळं न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.