मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – आठवले  

134

खोपोली । मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आग्रही भूमिका आहे. मात्र हे आरक्षण न्यायलयात टिकणार नसल्याचं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय. ते खोपोलीमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतं होते. तसचं मंदिरं, पुतळे बांधले नाहीत तर मतं मिळणार नाहीत असंही आठवले म्हणाले. त्याचबरोबर भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती भाजपाला फायदेशीर असल्याचा उल्लेखही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.

यावेळी त्यांनी राम मंदिर वादावरही भाष्य केलं. राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘इतिहास पहिला तर ती भूमी बुद्धाची आहे . जर सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यायची असेल तर त्याठिकाणी बुद्ध मंदिरासाठीही जागा दिली पाहिजे. कोर्टाचा निकाल येईपर्यंत मंदिर बांधण्याची घाई करू नये. राम मंदिर बांधावे पण मुस्लिमांवर दबाव टाकून बांधू नये’ असं यावेळी बोलताना आठवले म्हणाले.