मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0

अमरावती | लोकसभा निवडणूक जवळ येताच देशभरातील वातावरण तापू लागले आहे. यासोबतच अमरावती जिल्ह्यातही निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. धारणीचे माजी आमदार व आपल्या रोखठोक स्वभावाबद्दल सर्वश्रृत असलेले राजकुमार पटेल यांनी खासदार आनंदराव अडसुळ यांच्यासोबत मुंबईला जावून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

निवडणुकीच्या काळात आनंदराव अडसुळ यांच्या उपस्थितीत झालेल्या उध्दव ठाकरे व पटेल यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याचीही चर्चा आहे. त्यांची शिवसेना प्रवेशाची शक्यताही लवकरच होणार असे बोलले जात आहे.

पटेल यांनी चॅनलसोबत बोलताना सांगितले की, आनंदराव अडसुळ यांच्यासोबत आपण मुंबईला जावून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र शिवसेनेत प्रवेश घेतला नसुन मेळघाटातील समस्या व विकासासाठी ठाकरे यांचेशी चर्चा केली. या लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या पाठीशी उभे राहाल? असे विचारले असता; येत्या रविवारी कार्यकर्त्यांशी बोलून त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल अशी सावध प्रतिक्रिया पटेल यांनी दिली. त्यांनी पुढे असेही म्हटले की मंञालयातच आ.रवी राणा यांचेशी सुध्दा चर्चा झाली.राजकुमार पटेल यांच्या या सावध पविञ्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही चांगलीच चुरशीची होणार यात शंका नाही.