मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘मातोश्री’वर

संग्रहित

मुंबई | मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे आपला मुलगा अमित याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर पोहचले. अमित आणि मिताली बोरूडे यांचा विवाह येत्या 27 जानेवारी रोजी होत आहे. सध्या राज ठाकरे विविध हायप्रोफाईल लोकांची भेट घेऊन मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देत आहेत. यादरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले.