राहुरी तालुक्यातील मंदिरांमध्ये चोरी, 76 हजारांचा ऐवज लंपास

0

राहुरी | राहुरी तालुक्यातील तीन मंदिरांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. उंबरे, ब्राह्मणी आणि मानोरीतील देवीच्या मंदिरातून एकूण 76 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. यामध्ये ब्राह्मणीच्या ग्रामदैवत जगदंबा (मुक्ताई) मंदिरातून चोरट्यांनी चाळीस हजारांचे दागिने, उंबरे येथून अर्धा तोळे सोने आणि 10 हजार रुपये, तर मनोरी रेणुका मंदिरातून जवळपास दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती मिळसाच डीवायएसपी मदने, पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्यासोबतच सतीश शिरसाठ, किरण बनसोडे, दिनकर चव्हाण, सरोदे, धुमाळ, वैराळ, जायभाये आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, तालुक्यातील वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. रात्रीच्या दरम्यान पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.