राहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर, नांदेडमध्ये घेणार सभा

नांदेड | देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राहुल गांधीही देशभरात सभा घेत आहे. नुकतीच मोदींची नांदेडमध्ये प्रचारसभा झाली. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचीही नांदेडमध्ये सभा होणार आहे. आघाडीचे उमेदवार आणि माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या प्रचारासाठी ते नादेंडमध्ये येणार आहे.

महाआघाडीच्या नांदेड हिंगोली आणि लातूर लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. शहरातील नवा मोंढा येथील मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे. महाआघाडीचे नांदेड मतदारसंघाचे उमेदवार अशोकराव चव्हाण, हिंगोलीचे उमेदवार सुभाष वानखेडे, आणि लातूरचे मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारात ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

नादेंड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अशोक चव्हाणांचा हा गड आहे. यंदा अशोक चव्हाणांसमोर युतीच्या प्रताप चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या यशवंत भिंगे यांचे मोठे आव्हान आहे. अशोक चव्हाणांना या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची येथे सभा झाली. यानंतर काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात राहुल गांधी काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.