पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोन जागीच ठार

2

दौंड | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. दोन्हीही मृत व्यक्ती हे बसवकल्याण कर्नाटक तालुक्यातील कांबळेवाडी येथील रहिवासी आहेत.

या अपघातात चालक जगन्नाथ मलाले आणि क्लीनर जयानंद पुणेकर दोघे ठार जागीच ठार झाले. जगन्नाथ मलाले हा लोखंडी रॉड घेवून सोलापूरकडुन पुणे दिशेला भरधाव जात होता. त्यांनी गाडीला अचानक ब्रेक मारल्याने त्याच्याच गाडीतील पाठीमागील लोखंडी रॉड कॅबिन तोडून पुढे आले. यामध्ये चालक व क्लिनर यांचा चेंदामेंदा झाला आहे.